वर्षातला अमेझॉनचा सर्वात मोठा सेल, 75 टक्के मिळणार डिस्काउंट, आताच नोट करा तारीख

Amazon India वर वर्षातील पहिल्या मोठ्या सेलची घोषणा करण्यात आली आहे. या आगामी सेलचे नाव Amazon Great Republic Day Sale असे आहे.

Amazon Great Republic Day Sale १३ जानेवारीपासून सुरु होणार आहे. या सेलदरम्यान अनेक मोठ्या सवलती मिळतील.

Amazon Prime सदस्यांसाठी हा Amazon India सेल १३ जानेवारीला दुपारपासून १२ तास आधी सुरु होईल.

प्राइम मेंबर्सना सेलमध्ये लवकर प्रवेश मिळू शकेल. या काळात ते प्रथम चांगल्या डिल्सचा लाभ घेऊ शकतील. यासाठी Amazon Prime चे सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.

Amazon sale दरम्यान तुम्हाला बँक ऑफरचा लाभ देखील मिळेल. यामध्ये ग्राहकांना १० टक्के इन्स्टंट कॅशबॅक मिळेल, यासाठी तुम्हाला SBI कार्ड वापरावे लागेल.

Amazon Great Republic Day Sale २०२५ दरम्यान, ग्राहकांना नो-कॉस्ट EMI चे अधिक पर्याय मिळू शकतात.

Amazon ने सांगितले की, येथे स्मार्टफोनवर जास्तीत जास्त ४५ हजार रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट मिळेल, याशिवाय, तुम्हाला लॅपटॉप आणि टीव्हीवर ७ हजार रुपयांची एक्सचेंज सूट मिळेल.

Amazon च्या मते, काही उत्पादनांवर ७५ टक्के सूट मिळेल, यामध्ये इलेकट्रोनिक उपकरणांचा समावेश असेल.

Amazon sale दरम्यान, ग्राहकांना स्मार्ट टीव्ही आणि प्रोजेक्टर इत्यादींवर जास्तीत जास्त ६५ टक्के सूट मिळू शकते.