आजच्या डिजिटल युगात बहुतांश व्यवहार कार्ड किंवा UPI द्वारे होतात. तरीदेखील एटीएम कार्ड आपल्याला रोख रक्कम काढण्यासाठी आवश्यक ठरतं. पण याच सुविधेमुळे सायबर गुन्हेगारांचा धोका वाढतोय.
एटीएम कार्ड आपलं फक्त चार अंकी पिन नंबरने सुरक्षित असतं. हा पिन नंबर जर चुकीचा किंवा साधा ठेवला तर तुमचं अकाउंट काही सेकंदात रिकामं होऊ शकतं.
सोपे आणि क्रमवार नंबर जसे 1234, 1111, 0000, 2222 किंवा 4321 वापरणं धोकादायक आहे. असे नंबर सायबर गुन्हेगार सर्वात आधी वापरतात.
अनेक लोक आपली जन्मतारीख किंवा जन्मवर्ष पिन म्हणून ठेवतात. पण तुमच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरून हे नंबर सहज मिळू शकतात.
काही लोक आपला मोबाइल नंबर, गाडीचा नंबर किंवा आधार क्रमांकाचे अंक वापरतात. हे अंक सुद्धा सहज अंदाज लावता येतात आणि ते सुरक्षित नाहीत.
तज्ज्ञ सांगतात काय सांगतात?
अंदाज बांधता येतील असे नंबर कधीही पिनसाठी निवडू नका. कारण फसवे लोक तुमच्या रोजच्या माहितीवरून सहज पिन ओळखू शकतात.
सुरक्षित पिन नंबर निवडताना एक साधं लक्षात ठेवा, तो तुम्हाला लक्षात राहील पण इतर कुणालाही अंदाज येणार नाही, असा तो असावा.
तसेच पिन नंबर दर 6 ते 12 महिन्यांनी बदलणे आवश्यक आहे. त्यामुळे जुन्या पिनवर आधारित फसवणूक टाळता येते.
तुमचा पिन नंबर कुणासोबतही कधीही शेअर करू नका. पिन कुठेही लिहून ठेवू नका – कारण गहाळ झाल्यास तो तुमच्याच विरोधात वापरला जाऊ शकतो.
प्रत्येक एटीएम/डेबिट कार्डसाठी वेगळा पिन नंबर ठेवा. यामुळे धोका कमी होतो आणि तुमचे पैसे अधिक सुरक्षित राहतात.