बिअर, व्हिस्की, वाइन की रम उन्हाळ्यात काय पिऊ नये?

दारु शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामुळे ते न पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पण असं असलं तरी अनेक लोक याचं सेवन करतातच.

काही लोक ऋतुनुसार ब्रँड बदलतात. तर काही लोक कोणताही मैसम असोत, आपला ठरलेला ब्रँड पितात.

पण काही लोक ऋतु आणि दारुला घऊन संभ्रमात आहेत की उन्हाळ्यात कोणती दारु प्यावी? किंवा कोणती दारु चांगली.

बिअर खूप लाइट ड्रिंक आहे, यामध्ये अल्कोहोलचे प्रमाण फारच कमी असते. अशा परिस्थीती शरिराला हायड्रेट ठेवण्यासाठी लोक बिअर पितात.

पण लक्षात ठेवा की बिअरमध्ये सर्वात जास्त कॅलरीज आहेत, ज्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं.

जर तुम्ही ड्रिंकमध्ये टेस्टला प्रधान्य देत असाल तर वाइन नेहमीच एक चांगला पर्याय आहे. परंतू हे लक्षात घ्या की वाईनमध्ये बिअरपेक्षा जास्त अल्कोहोल असतं.

अनेक लोक म्हणतात रम गर्मीमध्ये पिण्याचं पेय नाही, तर ते थंडीत प्यायलं जातं, पण याबद्दल कुठेही पुरावा नाही.

रम ही वेस्ट इंडिज, क्यूबा, जमैका आणि एशियातील काही गरम देशांमध्ये वर्षभर प्यायली जाते.

वेस्ट इंडिज हे उबदार देश आहे. जिथे बाराही महिने उन्हाळा असतो. त्यामुळे जर रमने त्रास होत असता, तर ती या देशात इतकी लोकप्रिय नसती.