ब्रश केल्यानंतर की आधी कधी पाणी पिणं चांगलं?

सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी पाणी प्यायचं असा सल्ला डॉक्टर देतात. तर काही लोक म्हणतात तोंड न धुता पाणी प्यायलं आरोग्यासाठी चांगलं आहे.

अशात लोकं संभ्रम पडले आहेत की ब्रश करण्यापूर्वी की नंतर कधी पाणी प्यावं?

काही जण असं म्हणतात की रिकाम्या पोटी आणि ब्रश केल्या शिवाय पाणी प्यावं ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.

पण अनेकांचं असं म्हणनं आहे की ब्रश न करता पाणी प्यायलो तर तोंडातील जंत पोटात जातील ज्यामुळे ते शरिरासाठी हानिकारक ठरेल. अशावेळी लोक संभ्रमात पडतात की काय करायचं?

झोपेत असताना शरीरात पाण्याची कमतरता होते. त्यामुळे सकाळी उठल्यावर पाणी पिणे पचनक्रियेस मदत करते आणि टॉक्सिन्स बाहेर टाकते.

ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात, त्वचा चमकदार होते.

ब्रश केल्यावर तोंडातील नैसर्गिक लाळ नष्ट होते. ही लाळ पचनासाठी उपयुक्त असते. त्यामुळे ब्रशपूर्वी पाणी पिणे अधिक फायदेशीर मानले जाते.

पण एक गोष्ट लक्षात ठेवा सकाळी ब्रश न करता पाणी पिण्यासाठी रात्री ब्रश करुन झोपणं गरजेचं आहे.

तुमची ओरल हेल्थ चांगली असेल तर जंतू तोंडात रहाणार नाहीत आणि हेल्दी बॅक्टेरीया तयार होतील. ज्याचा शरीराला फायदाच मिळेल.

(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्दश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)