GK : ‘ही’ भारतातील पुरुष नदी
भारत हा नद्यांचा देश आहे. इथे वेगवेगळ्या देशातून नद्या वाहातात.
गंगा, सरस्वती, यमुना, नर्मदा, तापी यांसारख्या नद्या आपल्या देशात आहेत. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना ही होतो.
भारतात नद्यांना देवीचा मान दिला जातो. त्यामुळे त्याच्या किनारी अनेक भाविक नदीची पुजा करतात.
त्यामुळे भारतातील नद्यांची नावं ही स्त्री लिंगी आहेत.
पण तुम्हाला माहित आहे का की भारतात एक नदी आहे जी पुरुष लिंगी आहे.
खरंतर हा एक जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. ज्याबद्दल क्वचितच कोणाला माहित असेल.
ही नदी आहे ब्रम्हपुत्र नदी. या नदीला पुरुष नदी म्हटलं जातं.
ब्रह्मपुत्र या नदीचा पौराणिक कथांशी संबंधित आहे, ज्यामध्ये हिंदू देव ब्रह्मदेवाने या नदीला जन्म दिला.
ब्रह्मपुत्रा या नावाचा अर्थ संस्कृतमध्ये “ब्रह्माचा पुत्र” असा होतो. त्यामुळेच याला पुरुष नदी असं म्हणतात.