सैंध, काळं आणि रॉक सॉल्ट; काय आहे 3 मिठांमध्ये फरक?

बहुतेक घरांमध्ये सामान्यता पांढरं मीठ वापरलं जातं, पण अलीकडे ‘रॉक सॉल्ट’ किंवा ‘हिमालयन पिंक सॉल्ट’ची चर्चा वाढली आहे. पण लोक नेहमीच कन्फ्युज असतात की हे मीठ सारखेच आहेत की वेगवेगळे.

वेगवेगळ्या मिठामध्ये वेगवेगळे मिनरल्स असतात. त्यामुळे स्वाद आणि शरीरावर होणारा परिणामदेखील वेगळा असतो.

काळं मीठ यामध्ये सल्फेट, आयर्न (लोखंड), मॅग्नेशियम यासारखे घटक असतात. त्याची चव थोडी आंबटसर (टॅंगी) आणि उग्र असते. हा पचनासाठी उपयुक्त मानला जातो.

थोडं उग्र आणि आंबटसर चव. पाचनासाठी उपयोगी.

रॉक सॉल्ट / सेंध मीठ अनेकांना हे माहिती नसतं, पण सेंधा मीठ म्हणजेच रॉक सॉल्ट. यात सोडियम क्लोराइड भरपूर असतो आणि इतर ट्रेस मिनरल्सही असतात.

हे सामान्य मिठासारखीच चव. उपवासात वापरासाठी सर्वोत्तम.

पिंक सॉल्ट हिमालयातून मिळणाऱ्या पिंक सॉल्टमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे घटक असतात. त्यामुळे त्याची चव थोडी सौम्य आणि किंचित गोडसर लागते.

हे थोडं सौम्य आणि किंचित गोडसर चव. डाएटसाठी काही जण हे प्राधान्याने वापरतात.

प्रत्येक प्रकारचं मीठ वेगवेगळ्या आरोग्यदायी गुणधर्मांसह येतं. त्यामुळे ते केवळ चवीनुसार नव्हे, तर शरीराच्या गरजेनुसार वापरणं अधिक योग्य ठरतं.