Healthy Tips : रक्ताचा डाग असलेलं अंड खाऊ शकतो का? 

तुम्ही कधी अंड फोडताना त्याच्या पिवळ्या भागावर रक्ता सारखा किंवा लाल डॉट पाहिला आहे का?

काही लोक हा डाग असलेला भाग काढून टाकून अंड वापरतात, तर काही लोक ते अंड पूर्ण फेकून देतात.

अशात प्रश्न असा उपस्थीत रहातो की असं अंड खायचं की नाहीं?

अंड्यातील पिवळ बलकमध्ये रक्ताचे डाग असतील तर ते नीट शिजवून घेतल्यास ते शरीराला हानिकारक नसते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

म्हणजेच ते योग्य फ्राय केलेले किंवा उकडलेले असेल तर ते अंडे खाण्यात काही नुकसान नाही.

बरेच लोक रक्ताचा भाग चमच्याने उचलून काढतात आणि अंड शिवजतात, त्यातही काही नुकसान नसते.

जेव्हा अंडी फॅलोपियन ट्यूबमधून जाते तेव्हा त्यात बहुतेकदा मांस किंवा रक्ताचे तुकडे असतात. यामध्ये शरीराला हानी पोहोचवणारी कोणतीही गोष्ट नसते.

मात्र, अंड्याचा पांढरा भाग कधी गुलाबी, लाल किंवा हिरवा रंगाचा असेल, तर मात्र असं अंड खाऊ नये.

तज्ज्ञांच्या मते त्या अंड्यातील काही विषारी जीवाणूंच्या प्रभावामुळे रंग बदलतो. या प्रकरणात, अशी अंडी फेकून द्यावीत.