महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राजधानी दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस काल दिल्लीला रवाना झाले.
त्यांनी या दौऱ्यात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.
५ डिसेंबर २०२४ रोजी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.
मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांची ही पहिलीच भेट होती.
या भेटीवेळी देवेंद्र फडणवीसांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन नरेंद्र मोदींचे स्वागत केले. त्यासोबतच त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्तीही भेट म्हणून देण्यात आली.