आकाशाकडे पाहताना आपल्याला चमकणारे तारे, उल्का किंवा धूमकेतू दिसतात. हे सगळे दिसायला सारखे वाटले तरी विज्ञानात त्यांची वेगळी ओळख आणि व्याख्या आहे.
अनेकांना हे सगळं सारखंच वाटतं, तर अनेकांना त्यांना ओळखताना अडचण येते, त्यामुळे आम्ही ते तुम्हाला ओळखण्ययासाठी मदत करणार आहोत.
Asteroid म्हणजे काय?क्षुद्रग्रह (Asteroid) हे सौरमालेच्या निर्मितीच्या काळात उरलेले प्रचंड खडकाळ दगड आहेत. हे मुख्यतः मंगळ आणि गुरू यांच्या मधल्या पट्ट्यात आढळतात.
नासाने “बेन्नू” (Bennu) नावाच्या क्षुद्रग्रहावर (Asteroid) OSIRIS-REx मोहिम राबवली होती. यातून स्पष्ट झालं की क्षुद्रग्रह खडकाळ असतात, त्यांच्यावर बर्फ नसतो आणि ते ताऱ्यासारखे चमकत नाहीत.
धूमकेतू म्हणजे काय?
धूमकेतू (Comet) हे खडकांसोबत बर्फाचे मोठे गोळे असतात. जेव्हा ते सूर्याजवळ येतात तेव्हा सूर्याच्या उष्णतेमुळे त्यातून वायू आणि धूळ बाहेर पडतात.
धूमकेतूच्या मागे दिसणारं “चमकदार शेपूट” हा त्याला ओळखण्यासाठी सर्वात मोठा क्लू आहे. याचं उदाहरण म्हणजे प्रसिद्ध “हॅलीचा धूमकेतू” (Halley’s Comet).
उल्कापिंड म्हणजे काय?
उल्कापिंड (Meteor) म्हणजे अंतराळातून पृथ्वीच्या दिशेने आलेले लहान दगड किंवा धुळीचे कण. हे वातावरणात शिरताना जळतात आणि प्रकाशमान होतात.
पृथ्वीच्या वातावरणात जळताना हे उल्कापिंड आपल्याला “टूटता तारा” वाटतात. मात्र बहुतांश वेळा ते पूर्ण जळून जातात आणि जमिनीवर पोहोचत नाहीत.
थोडक्यात तुलनाक्षुद्रग्रह = खडकाळ दगड.धूमकेतू = बर्फ + खडक.उल्कापिंड = छोटे तुकडे जे वातावरणात जळतात.