Sorry आणि Apology कोणता शब्द कधी वापरायचा?

सॉरी हा माफीसाठी वापरला जाणारा इंग्रजी शब्द आहे. जो सगळ्याच भाषेतील लोक वापरतात.

पण Sorry सह आणखी एक इंग्रजी शब्द प्रचलित आहे किंवा वापरला जातो तो म्हणजे Apology.

याचमुळे अनेकदा लोक कन्फ्युज होतात की कोणता शब्द बरोबर आहे किंवा कोणता कधी वापरायचा.

तसे पाहाता दोघांचा अर्थ सारखाच आहे. पण असं असलं तरी त्याला वापरण्याची पद्धत ही वेगळी आहे.

Sorry हा शब्द अनौपचारिक किंवा सहज माफीसाठी वापरला जातो.

तर Apology हा शब्द अधिक औपचारिक आणि गंभीर माफीसाठी वापरला जातो.

जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल तुमच्या मनातील निराशा व्यक्त करायची असते तेव्हा “Apology” दिली जाते.

उदाहरणार्थ The company issued a formal apology for the inconvenience caused.

Sorry हा शब्द लहान गोष्टींसाठी वापरु शकता किंवा कॅजुअर गोष्टींसाठी वापरता येतो.

Apology हा मोठ्या चुका, गंभीर प्रसंगी, व्यावसायिक किंवा कामाच्या ठिकाणी वापरता येतो.