865 कोटींच्या घरात राहणार डोनाल्ड ट्रम्प, किती मिळणार पगार?
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज शपथ घेणार आहेत. शपथविधीसोबत ट्रम्प हे अमेरिकेचे ४७वे राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत.
राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांना कोट्यवधींचे वेतन तर मिळणारच आहे, शिवाय अनेक भत्ते आणि इतर सुविधाही मिळणार आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांना १,००,००० डॉलर प्रवास भत्ता आणि १९,००० डॉलर मनोरंजन भत्ता म्हणून दिला जाईल. यामध्ये त्यांच्या कर्मचारी आणि स्वयंपाकी यांच्या पगाराचाही समावेश आहे.
याशिवाय, राष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकारताच, त्यांना त्यांचा इच्छेनुसार व्हाईट हाऊसचे अंतर्गत डिजाइन करण्यासाठी १,००,००० डॉलर मिळतील.
व्हाईट हाऊसची किंमत सुमारे १०० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ८५० कोटी रुपये आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान व्हाईट हाऊस असेल, जिथे सर्व सुविधा उपलब्ध असतील.
ट्रम्प देश आणि विदेशात त्यांच्या प्रवासासाठी ‘एअर फोर्स वन’ आणि ‘मरीन वन’ हेलीकॉप्टर नावाच्या विशेष विमानाचा वापर करतील.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना रात्रदिवस गुप्त सेवा संरक्षण दिले जाते. तसेच राष्ट्रपती आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत उपचाराची सेवा मिळते.
‘एअर फोर्स वन’ हे अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांचे विशेष विमान आहे, ज्याला ‘फ्लाइंग व्हाईट हाऊस’ देखील म्हटले जाते. या विमानात एकावेळी १०० हून अधिक लोक प्रवास करू शकतात. हे विमान अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.