E20 की प्रीमियम पेट्रोल? ही माहिती तुमचे 6-7 रुपये वाचवेल
सध्या सोशल मीडियावर E20 पेट्रोलचीच चर्चा आहे. काहीजण याला फायद्याचं म्हणतायत, तर काहीजण याला इंजिनसाठी हानिकारक म्हणतायत. त्यामुळे गाडीधारक गोंधळले आहेत की नक्की करायचं कायं?
E20 म्हणजे नक्की काय?
भारत सरकारनं पेट्रोलमध्ये 20% एथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला आहे. यालाच E20 पेट्रोल म्हणतात. एथेनॉल हे ग्रीन फ्यूल मानलं जातं, जे प्रदूषण कमी करतं आणि इंधन आयातीवरील खर्चही घटवतं.
2023 पूर्वी बनलेल्या गाड्यांच्या मालकांना चिंता आहे की E20 फ्यूलमुळे इंजिनवर गंज येईल का, मायलेज कमी होईल का, की थेट इंजिनच खराब होईल?
या गोंधळामुळे अनेकांनी प्रीमियम पेट्रोल (Speed 95, XP95, Power 95 इ.) वापरायला सुरुवात केली आहे. जाहिरातींमध्ये सांगितलं जातं की प्रीमियम फ्यूलमुळे गाडीचं परफॉर्मन्स वाढतं, इंजिन उत्तम राहतं.
नॉर्मल पेट्रोलपेक्षा प्रीमियम फ्यूल 6-8 रुपये महाग आहे. त्यामुळे लोकांना वाटतं की जास्त पैसे दिल्यावर एथेनॉलपासून सुटका होईल.
पण खरी गोष्ट अशी आहे की प्रीमियम पेट्रोलमध्येही तितकाच (20%) एथेनॉल असतो. म्हणजे नॉर्मल आणि प्रीमियम दोन्हीमध्ये एथेनॉलचं प्रमाण समान आहे.
जर एथेनॉलपासून सुटका हवी असेल, तर प्रीमियम पेट्रोलने मदत होणार नाही. मग उगाच 6-7 रुपये जास्त देऊन फायदा काहीच नाही.
पूर्णपणे एथेनॉल-फ्री पेट्रोल हवं असल्यास फक्त 100 ऑक्टेन प्रीमियम पेट्रोल घ्यावं लागतं. पण त्याची किंमत तब्बल ₹160+ प्रति लिटर आहे.
अनेक कंपन्या लवकरच खास किट्स आणणार आहेत, ज्यामुळे E10 कंप्लायंट गाड्याही E20 पेट्रोल सहज वापरू शकतील.