काचेसारखं पारदर्शक बेडूक पाहिलंय का?

आज तुम्हाला एका अजब बेडकाच्या प्रजातीबद्दल सांगणार आहोत

त्याला आपलं शरीर बदलण्यास जास्त वेळ लागत नाही

सरड्याप्रमाणेच हे बेडूकदेखील आपला रंग बदलतं.

सहसा त्यांचे शरीर हिरव्या रंगाचे असते

परंतु त्यांना धोका जाणवताच ते संपूर्ण शरीर पारदर्शक करतात.

बेडकानं शरीर पारदर्शक बनवल्याने त्याला शिकारीपासून वाचण्यास मदत होते.

त्यांचे शरीर पारदर्शक झाल्यानंतर त्यांच्या शरीराचे सर्व अवयव दिसू शकतात

त्यांचं हृदयही स्पष्टपणे धडधडताना दिसतं.

याच कारणामुळे त्याला ग्लास फ्रॉग म्हणतात

या बेडकाच्या बहुतेक प्रजाती दक्षिण मेक्सिको, मध्य आणि दक्षिण अमेरिकेत आढळतात.