पाणीपुरीच्या थेल्यावर लाल रंगाचाच कपडा का लावतात?
चाट हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात.
असे काही लोक आहेत जे आपल्या ठरावीक पाणीपुरी किंवा चाट वाल्याकडे जाऊन चाट खातात.
या थेलेवाल्या दुकानात एक लाल-मरुन रंगाचा कपडा बांधलेला तुम्ही पाहिलं असाल, पण असं का? कधी विचार केलाय?
चाट-पकोड्यांच्या स्टॉलवर लाल रंगाचे कापड लावण्यामागे शास्त्रीय कारण आहे.
हा रंग खुपच चटक आहे, ज्यामुळे डोळ्यांनाही तो लगेच दिसतो आणि लोकांचे लक्ष फार लवकर आकर्षित करतो.
यामुळेच रस्त्यावरील विक्रेते आपला माल लाल रंगाच्या कपड्याने झाकून ठेवतात.
त्यामुळे लोकांच्या नजरा त्यांच्याकडे जातात आणि ते त्यांच्याकडे येऊन काहीतरी खरेदी करतात.
लाल कापड वापरण्यामागे आणखी एक मनोरंजक कथा आहे
असे म्हणतात की मुघल सम्राट हुमायूनच्या काळात दरबारात जेवणाची भांडी लाल कापडाने झाकायची प्रथा होती जी आजही अनेक ठिकाणी पाहायला मिळते.