असा जीव जो पाण्यात रहातो, पण पाण्याचा एक थेंबही पित नाही, सांगा कोण?
पृथ्वीवरील सर्व सजीवांना पाण्याची गरज असते. माणूसही पाण्याविना फार काळ जगू शकत नाही.
पण एक असा जीव आहे जो पाण्यात राहतो… तरीही कधीच पाणी पीत नाही.
हा आश्चर्यकारक प्राणी म्हणजे बेडुक, तो पाण्यात रहातो पण पाण्याचा एक थेंबही पित नाही.
खरंतर अनेक प्रजातींच्या बेडकांच्या त्वचेची विशेष रचना हे त्यांना पाणी शोषून घ्यायला मदत करतात, ज्यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते.
फक्त पाणीच नव्हे, तर ऑक्सिजनही बेडूक त्यांच्या त्वचेतून घेतात. पाण्यात असताना तो फुफ्फुस वापरत नाही.
कोरड्या हवामानात काही बेडकं त्वचेवर चिकट थर तयार करतात, जे शरीरातील ओलावा टिकवून ठेवतो.
बेडकाचं शरीरच अशा प्रकारे बनलेलं असतं की तो त्वचेमार्फत सगळी गरज पूर्ण करतो.
अनेकांना बेडकांची घाण वाटते, पण तुम्हाला माहितीय का की ते पर्यावरणासाठी खूप महत्त्वाचे आहे, किटक खाऊन ते जैवसाखळीचं संतुलन राखतात.
बेडुक म्हणजे निसर्गाचं एक अनोखं रसायनशास्त्र, पाणी न पिता पाण्यात जगणं हीच त्याची खासियत आहे.