कोणत्या देशाचं राष्ट्रीय फळ आहे पपई?

पपई हे अत्यंत पौष्टिक फळ आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे.

स्किनसाठी देखील हे फळ चांगलं असल्या कारणामुळे लोक ते चेहऱ्याला देखील लावतात. अनेक ब्युटी प्रोडक्ट्समध्ये पपईचा वापर केला जातो.

पपई हे तुमच्या आहारात एक उत्तम भर आहे, पाचक विकार कमी करण्यापासून ते तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत ती महत्वाचं काम करते.

हे फळ बाराही महिने उपलब्ध असल्याचे जाणकार सांगतात. आणि शरीराला विषमुक्त ठेवण्यासही मदत होते. त्यामुळे सॅलेडमध्ये पपई हमखास असते.

काही लोक पिकलेली पपई खातात तर कधी डॉक्टर कच्ची पपई खाण्याचा सल्लाही देतात.

याव्यतिरिक्त, ती रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि सामान्य पावसाळ्यातील आजारांपासून संरक्षण करते.

पौष्टिकतेने समृद्ध असलेल्या या फळाची लोकप्रियता असूनही, पपई हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे हे फार कमी लोकांना ठावूक असेल?

तुम्हाला पपई एखाद्या देशाचं राष्ट्रीय फळ आहे हे ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे.

पपई हे भारतातील अतिशय लोकप्रिय फळ आहे. पण ही पपई प्रत्यक्षात भारताचं नव्हे तर मलेशियाचे राष्ट्रीय फळ आहे.