Ginger Tea Recipe : केव्हा टाकावं चहात आलं? योग्य फॉर्म्युलानं चव होईल परफेक्ट
सगळ्या गोष्टी चहामध्ये एकत्र टाकल्याने चांगला चहा होत नाही. त्यामुळे चहा बनवताना टायमिंग आणि स्टेप्स खूप महत्वाच्या आहेत.
भारतात चहा पिणाऱ्यांची कमी नाही. दक्षिण भारतात तर घराघरात चहा प्यायला जातो.
अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहानेच होते आणि वेळावर चहा मिळाला नाही तरी अनेकांचा दिवस खराब जातो.
तसे पाहाता चहा (How to make ginger tea) वेगवेगळ्या पद्धतीचा प्यायला जातो, त्यात आलं टाकलेली चहा खूप जास्त प्रसिद्ध आहे.
टपरीवरच्या चहामध्येही आलं टाकलं जातं. पण कधीकधी आल्याचा योग्य पद्दतीने वापर न केल्याने चहा कधी कडू तर कधी बेचव लागतो.
त्यामुळे आल्याचा चहा बनवण्याची योग्य पद्धत काय आहे? हे समजून घेऊ.
सर्व प्रथम एका भांड्यात पाणी, दूध आणि साखर घालून ते मिश्रण उकळा. आले सोलून त्याचे छोटे तुकडे करा आणि वाटल्याल हलकं ठेचा.
काही लोक आलं इतकं ठेचतात की त्याचा रस बाहेर येतो. त्यामुळे आलं कापा किंवा त्याला हलकं ठेचा, त्याानंतर, चहामध्ये आलं घाला आणि 1 मिनिट तो उकळवा.
आता त्यात चहा पावड घाला आणि आणखी 1-2 मिनिटे उकळवा. तुम्ही किती कप चहा बनवत आहात त्यानुसार प्रत्येक गोष्टीचे प्रमाण ठेवा.