असा शब्द जो सरळ किंवा उलटा वाचला तरी सारखाच? सांगा उत्तर
जनरल नॉलेजशी संबंधीत प्रश्न वाचायला सर्वांना आवडतात. या अशा प्रश्नांमुळे लोकांच्या ज्ञानात भर पडते. शिवाय बुद्धीलाही चालना मिळते.
असाच एक भाषेशी संबंधीत प्रश्न आम्ही तुमच्यासाठी आणला आहे.
सांगा मग तो शब्द ज्याला आपण सरळ किंवा उलटं वाचलं तरी एकच अर्थ होतो.
चला थोडी हिंट देतो, हा शब्द मराठी भाषेतील एका सुंदर गोष्टीचं नाव आहे.
हा शब्द आहे “नयन”.
डोळ्यांना आपण मराठीत “नयन” असं म्हणतो. गंमत म्हणजे “नयन” पुढून वाचा किंवा मागून, तो शब्द तसाच राहतो.
अप्रतिम ना? ही आहे भाषेची गंमत!
“नयन” हा शब्द फक्त भाषेचीच नव्हे तर संस्कृतीचीही ओळख आहे.
त्याचा वापर कविता, गाणी, शेरो-शायरीतही मोठ्या प्रमाणात केला जातो.