आग्रहाचे आमंत्रण किंवा निमंत्रण असलेली कार्यक्रमाची पत्रीका तुम्हला एकदा तरी नक्कीच मिळाली असेल.
आमंत्रण किंवा निमंत्रणमध्ये अनेकदा लोकांचा गोंधळ उडतो की दोन्हीपैकी काय बरोबर आहे.
काही लोक तर दोघांचाही एकच अर्थ समजून केव्हा ही कोणताही शब्द वापरतात. पण असं नाही.
दोन्ही शब्दांचा वेगवेगळा अर्थ आहे आणि त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वापरतात.
जेव्हा एखादा नियोजित कार्यक्रमाबद्दल फक्त सूचित करायचे असते तेव्हा मुख्यतः आमंत्रण हा शब्द वापरला जातो.
जेव्हा ठराविक व्यक्तीच्या उपस्थतिथीशिवाय एखादा कार्यक्रम पार पडू शकत नाही तेव्हा निमंत्रण हा शब्द वापरला जातो.
याचाच अर्थ आग्रहाने कोणाला आपण बोलावतो आणि ती व्यक्ती आपल्यासाठी महत्वाची असते तेव्हा त्याला आपण निमंत्रण द्यायला हवे. पण खाद्या व्यक्तीला कार्यक्रमाबद्दल सांगणण्यासाठी तुम्ही आमंत्रण देऊ शकता.
उदाहरण
लग्नसोहळ्यासाठी निमंत्रण.
सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आमंत्रण.
मराठी भाषेत असे असंख्य शब्द असतील जे आपल्याला गोंधळात टाकतील. पण हीच खरी भाषेतील गंमत आहे.