Iphone मधील ‘i’ चा अर्थ काय?
आयफोन हा जगातील सर्वोत्तम फोनपैकी एक मानला जातो.
फोटो व्हिडीओसाठी तर आयफोन बेस्ट आहे. त्यामुळे लोक त्याचा सर्वाधीक वापर करत आहेत.
पण आयफोनबद्दल एक गोष्ट क्वचितच कोणाला माहित असेल.
ॲपलच्या उत्पादनांमध्ये ‘i’ चा अर्थ काय आहे हे माहिती आहे का?
आयफोन, आयपॅड आणि आयमॅक सारख्या ऍपल उत्पादनांमध्ये लिहिल्या जाणाऱ्या “i” बद्दल लोकांना नेहमीच उत्सुकता असते.
काही वर्षांपूर्वी, Apple सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी स्पष्ट केले की “i” म्हणजे “इंटरनेट” आहे, जो डॉट-कॉम बूम दरम्यान वेबचा वाढता प्रभाव शो करते.
स्टीव्ह जॉब्स म्हणाले की याचा अर्थ “Individual”, “Information”, “Instruct” आणि “Inform” असा देखील होऊ शकतो.
आता Apple च्या नवीनतम iPhone 16 आणि iOS 18 सह, “i” चा अर्थ “Intelligence” असा बनला आहे.
iPhone 16 सीरीजसह, कंपनी आपल्या वापरकर्त्यांना Apple Intelligence वैशिष्ट्ये देखील ऑफर करत आहे.