GK : भारताला स्वतंत्र मिळालं तेव्हा किती होता सोन्याचा भाव?
मागच्या काही दिवसात सोन्याचे दरांनी उच्चांक गाठला आहे.
दिवसेंदिवस ही किंमत वाढत चालली आहे.
सोन्याची ही वाढती किंमत कधी थांबेल किंवा कमी होईल हे सांगता येणं कठीण आहे.
पण यापूर्वी सोनं किती रुपयांना होतं हे तुम्हाला माहितीय का?
नोव्हेबर 2024 मध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 80 हजारांवर आहे, तर चांदीनेही किलोला 1 लाखांचा टप्पा ओलांडला.सोन्याचांदीची किंमत वर खाली होत आहे.
पण जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतात सोनं किती रुपये तोळं होतं असा कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का?
इंग्रजांकडून भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वतंत्र मिळालं, त्यावर्षी 10 ग्राम सोन्याची किंमत 88.62 रुपये होती.
आकडा पाहून नक्कीच धक्का बसला असेल. कुठे 88.62 रुपयांचं सोनं आणि कुठे 80 हजारांच्या पुढची आत्ताची रक्कम.
1947 पासून सोन्याची किंमत कित्येक पटीने वाढली आहे. हा आकडा खरंच घाम फोडणारा आहे.