गुडन्यूज! वाहतूक कोंडी होणार कमी, ठाणे रेल्वेस्थानक जोडले जाणार मेट्रोला
मुंबईकरांच्या सेवेत लवकरच मेट्रो दाखल होणार आहेत. मेट्रोचे काम सध्या वेगाने सुरू असून पुढील पाच वर्षात ही मेट्रो धावू शकेल.
मुंबईत मेट्रो प्रकल्पाचे जाळे पसरत आहे. मेट्रोमुळं वाहतुक कोंडी तर कमी होईलच पण प्रवाशांचा वेळदेखील वाचणार आहे.
मुंबईप्रमाणेच ठाण्यातही मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. अंतर्गत ठाणे मेट्रो प्रकल्पाला मागील वर्षी केंद्रीय मंत्रिमंडळाने परवानगी दिली होती.
आता या मेट्रोचे काम सुरू आहे. पुढील पाच वर्षात हा प्रकल्प सुरू होणार असल्याची शक्यता आहे.
ठाण्यात मेट्रो मार्ग 4 आणि 5 असे दोन प्रकल्प सुरू आहेत. हे दोन्ही मार्ग एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. तसा एमएमआरडीएचा मानस आहे.
मेट्रोची काही स्थानकेही मेट्रो चार आणि पाचला जोडली जाणार आहेत. तसंच, मेट्रो मार्गाची जोडणी थेट लोकलला देखील करण्यात येणार आहे.
त्यामुळं प्रवाशांना थेट मेट्रो मार्गाने प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर त्यामुळं लोकलमधील गर्दीदेखील कमी होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड आणि ठाण्याच्यामध्ये बांधण्यात येणाऱ्या नवीन ठाणे स्थानकाला मेट्रोचे स्थानक जोडले जाणार आहेत.
ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पासाठी 2029 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तसंच, हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर अंदाजे 7.31 लाख प्रवाशांना या मेट्रो रेल्वे सेवेचा लाभ होणार आहे.
हा प्रकल्प ठाण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. ठाण्यातील वाढती वाहतूक कोंडीवर या प्रकल्पामुळं थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.