GK : अंड्यामध्ये जीव कसा घेतो श्वास?

अंड्यातून काही प्राणी आणि पक्ष्याचे पिल्लू बाहेर येतं. हे तर आपल्या सर्वांना माहित आहे.

पण कधी विचार केला आहे का की, अंड्याच्या कवचाच्या आत असताना पिल्लू कसा श्वास घेतो?

अंड्यात हवा जात नाही किंवा बाहेर येत नाही शिवाय पिल्लाला जगण्यासाठी आवशक असलेलं पाणी आणि अन्न देखील अंड्यामध्ये मिळत नाही, मग पिल्लू किंवा एखादा जीव अंड्यामध्ये कसं जिवंत राहतं?

पिल्लाचे अंड्यात श्वास घेण्याचे तंत्र खरोखरच आश्चर्यकारक आणि गुंतागुंतीचे आहे. या प्रक्रियेला एयर सॅक सिस्टम म्हणतात.

अंड्याच्या आत एक पातळ थर असतो ज्याला अम्नियॉन म्हणतात. या थरात एक द्रव भरलेला असतो ज्यामध्ये तरंगत (पिल्लू) असते. पिल्लू या द्रवातून ऑक्सिजन घेते.

अंड्याच्या मोठ्या बाजूला एक एअर सॅक असतो. हे एअर सॅक अंड्याच्या बाहेरच्या वातावरणातून ऑक्सिजन घेते आणि पिल्लू या ऑक्सिजनचा वापर करते.

पिल्लू वाढत असताना हे एअर सॅक मोठे होत जाते आणि पिल्लूला अधिकाधिक ऑक्सिजन मिळतो.

अंड्याच्या आत पिल्लू पिवळ्या भागातून अन्न घेतो. पिवळा भाग हा पिल्लासाठी एक प्रकारचे खाद्य साठा असतो. तर पांढरा भाग हा पाण्याचा साठा असतो.

जेव्हा पिल्लाची पूर्ण वाढ होते तेव्हा ते अंड्याच्या कवचाला फोडून बाहेर येते. या प्रक्रियेला हैचिंग म्हणतात.