ट्रेनमधील सर्वात सुरक्षित डब्बा कोणता?
हल्ली रेल्वे अपघाताच्या बातम्या कानावर पडत आहेत, हे असे अपघात काही सांगून होत नाहीत. ते कुठेही आणि केव्हाही घडू शकते.
पण असं असलं तरी सर्वात सुरक्षित प्रवास हा रेल्वेचा आहे.
अशावेळी रेल्वेनं प्रवास करताना प्रवाशांच्या मनात एक प्रश्न कायम येतो की, रेल्वेचा कोणता डब्बा प्रवाशांना सर्वात सुरक्षित मानता येईल?
भारतीय रेल्वेकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य नाही. पण इंटरनेटवर याबद्दल चर्चा सुरु आहे आणि लोक आपले तर्क वितर्क लावत आहेत.
काही लोक आपल्या अनुभवातून उत्तर देत आहेत. तर काही तज्ज्ञांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
बहुतेक प्रवाशांच्या मते S1 हा भारतीय ट्रेनमधील सर्वात सुरक्षित डबा असेल. मात्र ट्रेनमधील सर्वात सुरक्षित डबा हा मधला डबा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
अपघातादरम्यान बाजूच्या डब्यांना सर्वाधिक धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र अनेक गाड्यांमध्ये हा क्रम बदलला जातो.
अस्वीकरण: हा अहवाल फक्त सामान्य माहितीसाठी आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही.