जर पृथ्वी फिरत असेल तर मग आपण का पडत नाही?
पृथ्वी आपल्या अक्षावर फिरत राहते. हे तर आपल्याला ठावूक आहे.
तसेच ती सूर्याभोवतीही गोल फिरते. पण या गोष्टी पृथ्वीवर राहून आपल्याला जाणवत नाही
पण मग या 24 तासांत आपल्याला कधीच धक्का का जाणवत नाही? चला यामागचं सायन्स समजून घेऊ
पृथ्वी 1600 किमी/तास वेगाने फिरते.
यासोबतच आपण आणि आपल्या आजूबाजूच्या वस्तूही फिरत राहतात.
पृथ्वीची ही स्थिर गती आपल्याला हे जाणवू देत नाही.
ज्याप्रमाणे विमानात चढल्यावर आपल्याला धक्का बसत नाही. त्याप्रमाणे पृथ्वीचं देखील आहे
पृथ्वी ही तिच्या नेहमीच्या वेगाने फिरते, त्यामुळे आपण पडत नाही. तसेच पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती यामध्ये महत्वाचं कार्य करते.
जर पृथ्वीची गती कमी झाली किंवा थांबली तर आपल्याला तीव्र धक्का नक्कीच बसेल