भात खाण्याची योग्य वेळ कोणती?
भारतातील बहुतेक घरांमध्ये भात खाल्ला जातो. पण, आजकाल फिटनेसमुळे अनेकजण भाताऐवजी इतर धान्य खाण्यास प्राधान्य देतात.
अनेकांची अशी कम्प्लेंट आहे की भात खाल्याने वजन वाढतं, तसेच पोट वाढतं
खरंतर यासाठी भात खाण्याची योग्यवेळ खूप महत्वाची आहे
तज्ज्ञांच्या मते, भात खाण्यासाठी दुपारची वेळ सर्वोत्तम आहे
काळ्या किंवा ब्राउन तांदळात असलेले व्हिटॅमिन बी मेंदूसाठी फायदेशीर आहे.
भातामध्ये कमी कॅलरीज असतात, ज्यामुळे वजन कमी होते आणि ते खाल्ल्याने पोटही भरलेले राहते.
भारतात पांढरा भात जास्त प्रमाणात खालं जातं, पण या भातामध्ये ब्राउन तांदळाच्या तुलनेत कमी फायबर्स असतात
पांढरा तांदळामध्ये शुगर जास्त असते, त्यामुळे डायबिटीज लोकांना भात न खाण्याचा सल्ला दिला जातो
पण तुम्ही आपल्या दैनंदिन आहारात तपकिरी तांदूळ आणि लाल तांदूळ समाविष्ट करू शकता, जे भरपूर फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत