Loose आणि Lose कोणता शब्द कधी वापरायचा

भाषा आणि शब्द नेहमीच लोकांना गोंधळात टाकतात. पण हे फक्त मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती भाषेसोबतच होत नाही तर इंग्रजी शब्द देखील अनेकदा गोंधळात टाकतात.

Loose आणि Lose हे असेच दोन शब्द आहेत, ज्यामध्ये कधी कोणता वापरायचा यामध्ये लोकांचा गोंधळ उडतो.

दोन्ही शब्दांचे उच्चार जवळपास सारखे वाटतात, पण त्यांचे अर्थ आणि उपयोग पूर्णपणे वेगळे आहेत.

Loose म्हणजे काय? हा विशेषण (Adjective) आहे, जो सैल, मोकळा किंवा घट्ट नसेल अशा गोष्टींसाठी वापरला जातो.

उदाहरण: This shirt is too loose for me. (हे शर्ट माझ्यासाठी खूप सैल आहे.)

Lose म्हणजे काय? हा क्रियापद (Verb) आहे, जो हरवणे, गमावणे किंवा नुकसान होणे अशा अर्थाने वापरला जातो.

उदाहरण: Don’t lose your keys again. (तुझ्या चाव्या पुन्हा हरवू नकोस.)

Loose आणि Lose मधला मुख्य फरक: Loose चा उपयोग सैल आहे हे दाखवण्यासाठी होतो. तर Lose चा उपयोग हरवले किंवा गमावले यासाठी होतो.

आता पुढच्या वेळी Loose आणि Lose मध्ये तुम्हाला अजिबात कन्फ्यूजन होणार नाही