Microwave आणि Oven एकच की वेगवेगळं?

हल्ली Microwave आणि Oven लोकांच्या आयुष्यातील महत्वाची गोष्ट बनली आहे. अनेक घरात हे सहज दिसून येतात.

अनेकांचा असा समज आहे की  Microwave आणि Oven दोन्ही सारखेच आहे आणि सारखंच काम करतं. पण तसं नाही.

काही लोक तर अगदी Microwave Oven असं एकत्र नाव घेतात. पण हे देखील चुकीचं आहे.

आपण जरी यांना एकच जमजत असलो तरी याचं कार्य, लागणारा वेळ, पद्धत ही वेगवेगळी आहे. चला याबद्दल जाणून घेऊ.

मायक्रोवेव्हमध्ये विद्युतचुंबकीय लहरी असतात, जे अन्नातील पाण्याचे रेणू गरम करतात. याचा वापर अन्न गरम करणे, फ्रीजमधून काढलेले अन्न डीफ्रॉस्ट करणे आणि झटपट अन्न शिजवणे यासाठी होतो.

ओव्हनमध्ये गरम हवेच्या प्रवाहाचा (कन्वेक्शन) किंवा तापलेल्या धातूच्या प्लेटचा वापर पदार्थ गरम करण्यासाठी होतो. याचा वापर बेकिंग, ग्रिलिंग, भाजणे आणि हळूहळू शिजवण्यास होतो.

मायक्रोव्हेवचा वापर मुख्यता बेकिंग, ग्रिलिंग किंवा भाजण्यास होत नाही, यात फक्त जेवण किंवा एखादा पदार्थ गरम केला जातो. यासाठी 30 सेकंद किंवा 1 मिनिट पुरेसं आहे.

मायक्रोव्हेवच सामान्य उपयोग: उरलेले अन्न गरम करणे, पॉपकॉर्न तयार करणे, किंवा भाज्या वाफवणे आहे.

ओव्हनचा सामान्य उपयोग: वेगवेगळ्या पदार्थांसाठी दीर्घकालीन स्वयंपाक प्रक्रियासाठी आहे.