वाटलं
सून अंघोळ करतेय;
डोकावून पाहताच
सासू धक्क्यात
नुकतंच लग्न झालेली एक वधू,
त्या दिवशी घरात एकटीच होती.
काही तासांनी सासू घरी आली,
तेव्हा घर शांत होतं.
सून कुठे दिसत नव्हती.
पण बाथरुममधून
पाण्याचा आवाज येत होता.
सासूला वाटलं सून आंघोळ करतेय.
खूप वेळ झाला
तरी सून बाहेर आली नाही
सासू सुनेच्या रुममध्ये गेली.
बाथरुममध्ये कुणीच नव्हतं,
पण कपाटाचं कुलूप उघडं होतं.
कपाटातील सोन्याचे दागिने
आणि 3 लाख रुपये रोख रक्कम
गायब होती.
ही घटना यूपीतल्या
संबल जिल्ह्याच्या
हयातनगर भागातील.
सुनेने फसवणूक आणि
लुटल्याची तक्रार
सासूने पोलिसात केली.