त्यांचे फोटो किंवा व्हिडीओ देखील तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील.
पण हा कुंभमेळा संपल्यावर नागासाधू कुठे जातात किंवा रहातात हे कोणालाच कळत नाही.
कुंभ मेळा संपला तर नागासाधू आपल्याला बाहेर कुठेच दिसत नाहीत मग ते कुठून येतात किंवा कुठे जातात? हे लोकांसाठी रहस्यच आहे.
त्यामुळे अशा रहस्याबद्दल जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक असतात.
असं सांगितलं जातं की कुंभमेळानंतर हे नागासाधू थंड ठिकाणी रहायला जातात जिथे कोणीच जाऊ शकत नाही. त्यामुळे ते कोणालाच दिसत नाहीत.
नागा साधूंबद्दल असं देखील सांगितलं जातं की त्यांच्या शरीरात उर्जाचं स्थर जास्त असतं ज्यामुळे त्यांना गर्मी किंवा उष्णता सहन होत नाही ज्यामुळे ते थंड ठिकाणी रहायला जातात.
असं म्हणतात की नागासाधू हिमालयाच्या उंच टोकावर रहायला जातात. जिथे खूप बर्फ पडतो. त्या ठिकाणी कोणी रहात नाही शिवाय कोणी जात देखील नाही, ज्यामुळे ते कोणाला दिसत नाही.
जेव्हा कोणतंही हिंदू धर्मामधील मोठं पर्व असतं तेव्हा हे नागा साधू हिमालयातून खाली उतरतात नाहीतर ते तिथे गुफा बांधून रहातात.
नागासाधू संसारातील अनेक गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवतात. त्यांना कसलाच मोह नसतो. एवढंच नाही तर ते स्वत:चंच पिंडदान करतात आणि आपलं माणूस म्हणून अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करतात.