Nail Cutter च्या मागे असलेल्या लहान छिद्रचं काम काय?

नख कापण्यासाठी नेल कटरचा वापर होतोच, पण याचे अनेक उपयोग देखील आहेत, ज्याबद्दल अनेकांना माहित नाही.

नेल कटरच्या मागच्या बाजूला एक लहान होल किंवा छिद्र तुम्ही पाहिला असेल. पण हा छिद्र काय कामाचा?

चला जाणून घेऊ म्हणजे तुम्हाला पुढच्या वेळी गरजेला त्याचा योग्य वापर करता येईल.

पक्कड नसताना लोक दातांनी वायर वरील प्लास्टीक काढतो. या वेळी तुम्ही नेल कटरचा वापर करु शकता.

एवढेच नाही तर अॅल्युमिनियमसारखे थोडी जाड तार वाकवण्यासाठी सुद्धा या छिद्राचा वापर करता येतो.

नेल कटरचा वापर करून तुम्ही मच्छर मारणारी कॉईल लावायचा स्टँड सुद्धा बनवू शकता. त्यासाठी नेल कटर मधील लहान अवजारे काढा आणि तो जमिनीवर ठेवा. तुमचा कॉईल स्टँड तयार.

नेल कटरच्या मागे असलेले छिद्र फक्त शोभेसाठी नसून ते खूप उपयोगी आहे. गरज पडल्यास तुम्ही ते चावीचे रिंग म्हणून वापरु शकता.

दिसायला छोटासा असलेला हा नेल कटर किती उपयोगी आहे हे तुम्हाला आता कळालेच असेल.

आता तुम्ही त्याचा घरातील वेगवेगळ्या कामासाठी वापर करु शकता.