ATM पिनसाठी ‘हे’ नंबर चुकूनही ठेवू नका

आजकाल लोकांना रोख रक्कम क्वचितच लागते. ऑनलाइन पेमेंट, UPI आणि कार्ड व्यवहार सर्वत्र चालतात.

पण प्रवासात किंवा काही ठिकाणी अजूनही कॅशची गरज पडते.

एटीएम कार्डने पैसे काढणं, ऑनलाइन खरेदी, बिल भरणं, तिकीट बुक करणं सगळं काही काही मिनिटांत शक्य होतं. यामुळे वेळ वाचतो आणि व्यवहार सोपे होतात.

याच सोयीमुळे सायबर गुन्हेगारांनी एटीएम वापरणाऱ्यांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. चुकीचा पिन नंबर निवडल्यास, खाते काही सेकंदात रिकामं होऊ शकतं.

मग आता हे नंबर किंवा आकडे कोणते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

1234, 1111, 0000, 5555, 4321 असे सोपे नंबर, तसेच जन्मतारीख किंवा वर्ष (उदा. 1308, 1511, 1999, 2000) मोबाइल नंबर, गाडी नंबर किंवा आधार क्रमांकाचे आकडे हे सगळे अंदाज लावणे अगदी सोपे असतं.

असा पिन निवडा ज्याचा अंदाज लावता येणार नाही. तसेच तो प्रत्येक 6-12 महिन्यांनी पिन बदला

पिन कुणासोबतही शेअर करू नका, कुठेही लिहून ठेवू नका आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक कार्डासाठी वेगळा पिन ठेवा

एटीएम कार्ड व्यवहार जलद आणि सोपे असतात, पण पिन नंबर निवडताना सावधगिरी महत्त्वाची आहे.थोडीशी चूक तुम्हाला मोठं नुकसान देऊ शकते.