डी गुकेश हा सर्वात तरुण बुद्धिबळ विश्वविजेता ठरला आहे. वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी तो जगज्जेता बनला.
विश्वनाथ आनंद यांच्यानंतर जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा गुकेश हा दुसरा भारतीय ग्रँडमास्टर ठरला आहे.
बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन ग्रँडमास्टर डी गुकेशने किती आणि कोणत्या शाळेतून शिक्षण घेतले आहे ते जाणून घेऊयात.
ग्रँडमास्टर डी गुकेशचे पूर्ण नाव डोमराजू गुकेश आहे. त्यांचा जन्म ६ मे २००६ रोजी चेन्नई येथे झाला.
मीडिया रिपोर्टनुसार, त्याने एका मुलाखतीत सांगितले की, चौथीच्या वर्गानंतर तो सतत शाळेत गेला नाही.
त्याचे वडील रजनीकांत हे ENT सर्जन आहेत आणि आई पद्मा माइक्रोबायोलॉजिस्ट आहेत.