अंजीर Veg नाही Non Veg आहे? कसं, तुम्हाला माहितीय का?

प्रत्येक फळ हे शाकाहारीच्या श्रेणीत येते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण तुम्हाला माहितीय का की अंंजीर त्यासाठी अपवाद आहे?

तुम्ही जे अंजीर शाकाहारी असल्याचे समजून खात आहात ते शाकाहारी नसून मांसाहारी आहे. 

या फळाला मांसाहारी म्हणण्याचे कारण म्हणजे त्याची परागकण प्रक्रिया.

आम्ही तुम्हाला सांगतो, अंजीरच्या उत्पादनामध्ये गांधीलमाशी महत्त्वाची भूमिका बजावतात.

ओस्टिओल नावाच्या छोट्या छिद्रातून गांधीलमाशी अंजीरच्या फुलामध्ये प्रवेश करतात.

यानंतर गांधीलमाशी अंजीराच्या फुलाच्या आत अंडी घालते दरम्यान ती आत अडकते आणि मरते. या प्रक्रियेला ‘डेड-वॉस्प’ प्रक्रिया म्हणतात.

गांधीलमाशीची अंडी अंजीराच्या आतील भाग खातात आणि विकसित होणाऱ्या अळ्यांमध्ये उबतात.

अळीच्या विकासानंतर अंजीराचे फळ तयार होते. आणि अशाप्रकारे मृत गांधीलमाशी आणि त्याच्या अळ्या फळांचा एक भाग बनतात, जे सामान्यतः खाल्ले जाते.

यामुळेच अंजीरला मांसाहारी म्हणतात