एकदा झाकण उघडलं की किती दिवसात संपवायची दारू?

तुमच्या घरी बराच काळापासन ठेवलेली दारू किती काळाने पिण्यायोग्य राहील हे देखील इतर घटकांसह त्यात असलेल्या साखर आणि अल्कोहोलच्या प्रमाणावर अवलंबून असते.

वाइन जितकी जुनी तितकी तिची चव चांगली असते, असं म्हणतात. पण प्रत्येक वाईनच्या बाबतीत असे होत नाही. काही वाइनची चव जुनी होण्यासोबत चांगली असेलच असे नाही.

अनेक महिने राहिलेली स्कॉच किंवा जिनची बाटली रिती करण्याचे शौकीन अनेकजण असतात.पण आपल्या आरोग्यासाठी हे चांगले असते का?

जसे व्हिस्कीचे शेल्फ लाइफ अनिश्चित असते. परंतु 1-2 वर्षांनी उघडल्यानंतर त्याची चव देखील कमी होऊ लागते. कोणती दारु किती दिवस ठेवता येते? जाणून घ्या.

बिअर दारूपेक्षा लवकर एक्स्पायर होते. साधारणपणे बिअर 6 महिन्यांत एक्स्पायर होते. कॅन असो किंवा बिअरची बाटली, एकदा उघडली की ती एक-दोन दिवसांत संपली पाहिजे.

व्हिस्की हे एक हार्ड ड्रिंक आहे जे वेळेनुसार जुनी होत नाही. एकदा बाटली उघडल्यानंतर ऑक्सिडेशन होते ज्यामुळे तुमच्या पेयाची चव आणि फ्लेवर बदलतो.

एकदा रम बाटलीचे सील उघडले की, ऑक्सिडेशन प्रक्रिया जलद होते ज्यामुळे तिची चव झपाट्याने बिघडते तसेच चव देखील संपते. जर रमची बाटली उघडली असेल तर ती एका छोट्या बाटलीत भरून ती चांगली बंद करून ठेवा.

टकीला बाटली जितकी जास्त वेळ उघडी राहते तितकी ती तिची ताकद आणि सुगंध गमावते. जर तुमच्या घरात टकिलाची बाटली एक वर्षापेक्षा जास्त काळ ठेवली असेल तर ती हानिकारक नसेल. पण जर टकीला शॉट घेण्यापूर्वी त्याचा वास चांगला येत नसेल तर त्याचा वापर करू नका.

हा लेख केवळ माहितीसाठी असून कोणत्याही प्रकारचे पेय घेण्यास दुजोरा देत नाही. कोणतंही व्यसन हे वाईटच असतं.