गांधी घराण्यातील प्रियांका गांधी कितव्या खासदार

प्रियांका गांधींची संसदेत एन्ट्री

गांधी घराण्यातील त्या नववी व्यक्ती आहेत ज्या संसदेत पोहोचल्या आहेत.

गांधी घराण्यातील प्रियांका गांधी वड्रा यांनी वयाच्या  ५२ व्या वर्षी अधिकृतरित्या निवडणुकीत पदार्पण केले.

केरळ मधील वायनाड मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर प्रियांका गांधी वड्रा यांनी आज खासदार म्हणून शपथ घेतली.

आम्ही संविधानाच्या तत्वांसाठी लढत आहोत, त्यामुळेच मी राज्यघटनेची शपथ घेतली.

मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, सोनिया गांधी, रेहान आणि मिराया वड्रा हे देखील प्रियांका गांधींच्या संसदेत शपथविधी समारंभात उपस्थित होते.

आपल्या बहिणीला पाहून राहुल गांधी खुश दिसले, त्यांनी स्वतः खासदारांसोबत प्रियांका गांधी वड्रा यांच्यासोबत फोटो क्लिक केले.

संसदेत देशाचे प्रश्न मांडणे, पक्ष आणि देशासाठी लढणे याला माझे प्राधान्य असेल, असं प्रियांका गांधी वड्रा म्हणाल्या. 

प्रियांका गांधी यांनी संविधानाची प्रत हातात घेऊन खासदार म्हणून शपथ घेतली.