ट्रेनमध्ये Side Birth वर 2 लोक असतील, तर वर असलेला प्रवाशानं कुठे बसायचं?
रेल्वेनं आरामदायी प्रवास करण्यासाठी आपल्याला दोन महिने आधी तिकिट काढावं लागतं, तरच तिकिट कन्फर्म मिळते.
पण कधीकधी असं होतं की प्रवाशांना आरएसी सीट मिळतात. अनेकांना या सीटची काळजी वाटते.
त्यांना असे वाटते की कोणीतरी त्यांना इथून उठवेल. तसेच याचे नियम नीट माहित नसल्यामुळे फसवणूक होते.
पण आज आम्ही तुम्हाला रेल्वेचे नियम सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या मनातील Side Birth सीटची भीती गायब होईल आणि RAC चे नियम देखील लक्षात येतील.
दोन RAC प्रवासी खालच्या बाजूला बसले आहेत असे समजू. आता वर असलेल्या व्यक्तीला खाली असलेल्या सीटवर बसायचे असेल तर त्यासाठी काय नियम आहे?
रेल्वेचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार म्हणाले, RAC सीटवर 2 लोक बसतात. ते दिवसा बसून प्रवास करू शकतात आणि रात्री पाय पसरून झोपायला हरकत नाही.
बाजूच्या वरच्या सीटवरचा प्रवासी दिवसा खालच्या सीटवर बसू शकतो. पण रात्री झोपताना त्याला सीट रिकामी करावी लागेल.
रेल्वे नियमावलीनुसार, ट्रेनमध्ये झोपण्याची वेळ रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत असते. यावेळी, बाजूच्या वरच्या सीटवरील प्रवाशाला खालच्या सीटवर बसता येणार नाही.
जर त्याने बसण्याचा आग्रह धरला तर टीटीईकडे तक्रार करता येईल. TTE त्याला जागेवरून काढून टाकेल.