लाल, काळा की पांढरा कोणत्या माठातलं पाणी फायदेशीर?
उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे आणि हळूहळू खूप जास्त उकाडा जाणवू लागला आहे.
उन्हाळ्यात तहान ही खूप लागते. सतत पाणी पिऊनही कधीकधी मन शांत होत नाही, अशावेळी लोक थंड पाणी पितात. तेव्हा माठातील पाणी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
तुम्ही बाजारात पाहिलंच असेल की तिथे वेगवेगळ्या रंगाचे माठ उपलब्ध आहे. ज्यामध्ये लाल, काळा आणि पांढरे माठ दिसतात.
अशावेळी अनेकांच्या मनात प्रश्न येतो की कुठलं माठ विकत घ्यावं किंवा कुठल्या माठातलं पाणी पिणं जास्त फायदेशीर राहिल? चला याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात पाहू.
तसे पाहाता तीनही माठातील पाणी पिणं शरीरासाठी उत्तम आहे. पण यासर्वात काळं माठ चांगलं आहे कारण ते पाणी लवकर थंड करतो.
काळा रंग हा उष्णता वेगाने शोषून घेतो. त्यामुळे काळ्या माठातील पाणी तुलनेनं लवकर थंड होतं.
लाल आणि पांढऱ्या माठातील पाणीही शरीरासाठी फायदेशीर असतं. मात्र, ते काळ्या माठाइतक्या वेगाने थंड होत नाही.
तरीही हे दोन्ही पर्याय देखील चांगले मानले जातात.
माठाचा कोणताही रंग असो, तो नैसर्गिक मातीपासून बनवलेला असेल तर ते पाणी आरोग्यासाठी चांगलं राहील. मात्र, सर्वात जास्त थंड पाणी हवं असेल, तर काळा माठ सर्वोत्तम पर्याय ठरतो.