मुख्याध्यापकांच्या सहीचा चेक पाहून
कॅशिअरला चक्कर
एका शाळेच्या
मुख्याध्यापकांच्या सहीचा चेक
देशभर चर्चेचा विषय ठरला.
हिमाचल प्रदेशच्या सिरमौरमधील
रोनहाट सरकारी
माध्यमिक शाळेतील घटना.
7,616 रुपयांचा चेक,
ज्यावरील रकमचे आकडे बरोबर होते,
पण शब्दांनी धक्का दिला.
7,616 आकडा इंग्रजी अक्षरात
Seven Thousand Six Hundred and Sixteen असा हवा होता.
पण चेकवर 7,616 साठी
Saven Thursday Six Harendra Sixty असं लिहिलं होतं.
मराठीत वाचायचं तर
‘सवेन थर्सडे सिक्स हरेन्द्र सिक्सटी’
असा उच्चार होईल.
अनेकांसाठी हा चेक जोकचा
विषय बनला. पण शाळा व्यवस्थेसाठी
लाजिरवाणी बाब.
या प्रकरणानंतर
शिक्षण विभागाने
तात्काळ कारवाई केली.