भारतातील ‘ही’ ठिकाणं परदेशी लोकांकडून सर्वात जास्त Google Search
भारताचे सौंदर्य पाहण्यासाठी परदेशी पर्यटक प्रत्येक वर्षी भारतात येतात.
भारतात येण्यापूर्वी परदेशी पर्यटक नक्कीच इथे कुठे फिरायला यायचं याबद्दल सर्च करतात.
जेणे करुन ते त्यांचं आवडीचं ठिकाण निवडू शकतील
शिवाय त्याबद्दल जास्तीची माहिती देखील मिळेल
पण तुम्हाला माहितीय का की कोणत्या ठिकाणांबद्दल परदेशी लोक सर्वात जास्त सर्च करतात?
दिल्ली: राजधानी दिल्ली लाल किल्ला आणि कुतुबमिनार सारख्या प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे.
मुंबई: बॉलीवूड कनेक्शन, सुंदर समुद्रकिनारे आणि गजबजलेल्या रस्त्यांसाठी प्रसिद्ध.
जयपूर: गुलाबी शहर हे आश्चर्यकारक राजवाडे आणि दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे, जे इतिहास प्रेमींसाठी भेट देण्यासारखे आहे.
लेह: हिमालयात वसलेले लेह हे बौद्ध वारसा आणि थरारक उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे.