कोणत्या वाहानांना टोलनाक्यावर भरावा लागत नाही Toll?
भारतामध्ये राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेस-वे झपाट्याने वाढत आहेत. या रस्त्यांच्या देखभालीसाठी सरकार टोल कर आकारतं. प्रत्येक वाहनचालकाला टोलनाक्यावर शुल्क द्यावंच लागतं.
NHAI ने काही विशेष व्यक्तींना टोल माफी दिली आहे. म्हणजेच त्यांना कोणत्याही महामार्गावर टोल भरण्याची गरज नाही. चला, पाहू या कोण आहेत हे भाग्यवान लोक?
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा सभापती आणि मंत्री यांना टोलमाफी लागू आहे.
सांसद (MPs), आमदार आणि विधानपरिषदेचे सदस्य हे लोक सरकारी कामासाठी प्रवास करत असतील, तर त्यांनाही कोणताही टोल कर द्यावा लागत नाही.
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि न्यायाधीश, तसेच उच्च न्यायालयांचे न्यायमूर्ती यांनाही टोलमाफी मिळते. त्यांचं सरकारी काम अडथळ्याशिवाय सुरू राहावं हा उद्देश.
भारतीय लष्कर, नौदल, वायुसेना अधिकारी अर्धसैनिक दल आणि पोलीस अधिकारी (वर्दीतील) यांनाही टोल करातून संपूर्ण सूट दिली आहे.
रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाची वाहने नेहमी तातडीच्या सेवांसाठी असतात. म्हणून त्यांना टोल न देता थेट पुढे जाण्याची परवानगी असते.
परमवीर चक्र, अशोक चक्र, महावीर चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र विजेत्यांना टोल कर भरण्यापासून पूर्ण सूट आहे. ओळखपत्र दाखवणं मात्र आवश्यक आहे.
काही ठिकाणी स्थानिकांना वार्षिक पास दिले जातात. या पासमुळे रोजच्या प्रवासात टोल कर माफ होतो. परिसरातील लोकांसाठी हा मोठा दिलासा ठरतो.
बहुतांश वाहनांना टोल द्यावाच लागतो. पण राष्ट्रसेवा, न्याय, सुरक्षा आणि आपत्कालीन सेवांना NHAI ने टोलमाफी देऊन त्यांचं काम अधिक सुलभ केलं आहे.