आजकाल सोशल मीडियावर एखादी गोष्ट झटपट व्हायरल होते, मग ती खरी की खोटी हे कोणी पाहातच नाही
त्यातच एक जुना समज आहे की डोक्यावर दोन भोवरे असले की दोन लग्न होतात किंवा दोन बायका असतात. पण हे किती खरं आहे आणि सामुद्र शास्त्र काय सांगतं?
आपल्यापैकी अनेकांच्या डोक्यावर एक किंवा दोन भोवरे (whirls) असतात.
लोक म्हणतात दोन भोवरे म्हणजे ही व्यक्ती हट्टी असते आणि तिचे दोन लग्न होतात. पण हे फक्त समज किंवा अफवा आहेत.
सामुद्रिक शास्त्रानुसार, हे भोवरे स्वभाव, मनःस्थिती आणि भविष्याचे संकेत देतात.
सामुद्रिक शास्त्र काय म्हणते?
पं. आलोक पंड्या, ज्योतिषाचार्य, म्हणतात की डोक्यावरचे भोवरे म्हणजे तुमच्या अंतर्मनाचा आरसा आहे.
एक भोवरा असलेले लोक शांत, संयमी, विश्वासू मित्र असतात, तर दोन भोवरे असलेले लोक हट्टी, चिडचिडे, पण सुधारता येण्याजोगे असतात.
एक भोवरा लोक प्रामाणिक आणि खरं बोलणारे असतात, ते जीवनात समाधान आणि जास्त आनंगदी असतात, तर दोन भोवरे असलेले लोक आपले मत मांडल्याशिवाय राहत नाही, त्यांच्या नातेसंबंधांमध्ये थोडी अस्थिरता असते.
सामुद्रीक शास्त्र म्हणतं की डोक्यावरचे भोवरे हे व्यक्तीच्या लग्नाबद्दल नाही तर स्वभावाबद्दल सांगतात आणि व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू उघडतात.