जगातील असा देश जिथे मुलं जन्माला येत नाहीत

सध्या जगाची लोकसंख्या खूप वेगाने वाढत आहे. त्यामुळे लोकसंख्येत होणारी लक्षणीय वाढ हा चिंतेचा विषय बनला आहे.

अशातच तुम्हाला अशा देशाविषयी सांगणार आहोत जिथे मुलं जन्माला येत नाहीत.

वेटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे. ज्याठिकाणी ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च नेते राहतात. येथे त्यांचा अधिकारीक आवास आहे.

यादेशात केवळ पादरी राहतात. म्हणजेच या देशात फक्त पुरुष राहतात आणि सर्व ब्रम्हचारी आहेत.

वेटिकन सिटीच्या पादरींना धार्मिक कारणामुळे लग्न करणे किंवा मुलांना जन्म देणे याची परवानगी नाही.

हा देश जगातील सर्वात सुंदर देशांपैकी एक असला तरी कोणीही व्यक्ती वेटिकन सिटीला त्यांचे जन्मस्थान म्हणू शकत नाही.

याच कारणाने येथील रुग्णालयात मुलांना जन्म देण्यासाठी कोणतीही सुविधा नाही.

वेटिकन सिटीची लोकसंख्या 800 असून यांच्यात केवळ 30 महिला आहेत ज्या नेहमी या देशात राहत नाहीत.