भाडेकरूंसाठी कायद्याने दिलेत हक्क, घरमालकालाही माहित असाव्यात त्याच्या लिमिट्स
भारतातील मॉडेल टेनन्सी ॲक्ट २०२१ हा घरमालक आणि भाडेकरू दोघांच्या हिताचे रक्षण करतो.
या कायद्यात भाडेकरूंना काही अधिकार देण्यात आले आहेत.
प्रत्येक भाडेकरूला मालमत्तेचा शांततेनं राहण्यासाठी हे अधिकार आहे.
घरमालक पूर्वसूचनेशिवाय कधीही घरात येऊ शकत नाहीत.
कराराच्या समाप्तीनंतर भाडेकरूला सुरक्षा ठेव परत मिळण्याचा अधिकार आहे.
अनावश्यक भाडेवाढीबाबत भाडेकरू घरमालकाच्या विरोधात आवाज उठवू शकतो.
भाडेकरू घरमालकाला नोटीस देऊन त्याचा भाडे करार संपुष्टात आणू शकतो.
घरमालक जाती, धर्म, लिंग किंवा खाण्याच्या सवयींच्या आधारावर भाडेकरूंसोबत भेदभाव करू शकत नाहीत.
एखाद्या भाडेकरूला आपला छळ होत आहे असे वाटत असेल तर ते तक्रार करू शकतात.