पोलिसांना मराठीत काय म्हणतात?
आपण आपल्या रोजच्या जीवनात नकळत इतके इंग्रजी शब्द वापरतो की आपल्याला त्याचा मराठी अर्थ सांगता येणार नाही.
शैक्षणीक जीवनात तसेच ऑफिसमध्येही इंग्रजी बोललं जातं. परंतू रोजच्या जीवनातही काही शब्दांचा इंग्रजी वापर करतो.
आता हेच घ्या ना आपण ऑफिस किंवा कॉलेज असं सहज म्हणून जातो. पण यांचा मराठी अर्थ फार कमी लोकांना ठावूक आहे.
ऑफिसला मराठीत कार्यालय म्हणतात, तर कॉलेजला मराठीत महाविद्यालय म्हणतात.
असाच आणखी एक शब्द आहे ज्याला मराठीत काय म्हणतात ते अनेकांना ठावूक नाही.
हा शब्द आहे पोलीस, कोणत्याही गुन्ह्याच्या वेळी सर्वात पहिला शब्द आठवतो तो पोलीस.
कुठेही हाणामारीची किंवा मग घरगुती वाद, प्रत्येक वेळी पोलीस तिथे पोहोचतातच. त्यामुळे हा शब्द रोजचाच आहे.
हा शब्द आपण सरास वापतो, पण याचा मराठी पर्याय विचारला तर तुम्हाला सांगता येईल?
पोलिसांना मराठीत आरक्षक असं म्हणतात. सावरकरांनी पोलीस या शब्दासाठी आरक्षक हा मराठी पर्याय सुचवला आहे.