भांग हा गांजाच्या झाडाचा एक भाग आहे. तरी अनेक लोक भांग सरास पितात. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की भांग प्यायल्यावर नक्क असं काय होतं?
गांजाचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील डोपामाइन हार्मोन वाढते. याला आनंद वाढवणारे संप्रेरक असेही म्हणतात. तीच गोष्ट भांगेसाठी देखील लागू होते.
हे खाल्यामुळे लोकांना खूप आनंदी असल्यासारखं वाटतं आणि लोक खूप स्लो होतात.
तुम्ही भांग खाल्या किंवा प्याल्यास, नशा चढण्यास 45 ते 60 मिनिटे लागू शकतात. सिगारेटप्रमाणे धुम्रपान केल्यास 10 ते 15 मिनिटांत तुम्हाला नशा चढते.
भांगची नशा आपला मेंदू अतिक्रियाशील बनवते. यामुळे विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी होते आणि एखाद्याला त्याच्या सभोवतालच्या गोष्टी म्हणजेच आजूबाजूला काय चाललंय हे जाणवतच नाही.
डॉक्टरांच्या मते, भांग जास्त प्रमाणात आणि दीर्घकाळ सेवन केल्यास त्याचा मेंदूवरही नकारात्मक परिणाम होतो.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, भांगचे बरेच फायदे आहेत. उदाहरणार्थ, भांग मानसिक आजारांमध्ये वापरली जाते. स्मृती परत मिळविण्यासाठी मर्यादित प्रमाणात देखील याचा वापर केला जाऊ शकतो.
याशिवाय वारंवार लघवी होण्याच्या समस्येपासूनही यामुळे आराम मिळू शकतो.
(ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)