पृथ्वीनं फिरणं थांबवलं तर काय होईल?

पृथ्वी दर 23 तास, 56 मिनिटे आणि 4.1 सेकंदात स्वतःच्या अक्षाभोवती एक पूर्ण फेरी मारते. पण कल्पना करा, जर एक दिवस अचानक पृथ्वी फिरणं थांबवलं, तर काय होईल?

हा विचार कदाचित अनेकांनी केला नसेल, किंवा विचार करतील की काय होईल? जास्तीत जास्त दिवस-रात्र होणार नाही, पण असं नाही….

वैज्ञानिकांनी यावर संशोधन केलं आहे आणि जर पृथ्वीने स्वत: भोवती फिरणं थांबवलं तर त्याचे भयंकर परिणाम होतील असं सांगितलं आहे. चला जाणून घेऊया पृथ्वीच्या फिरणं थांबल्यास काय परिणाम होतील.

‘ABC’च्या एका रिपोर्टनुसार, जर पृथ्वी फिरणं थांबली, तर संपूर्ण सजीव सृष्टीवर प्रलय कोसळू शकतो. याचे परिणाम इतके भीषण असतील की जगातील प्रत्येक गोष्ट बदलून जाईल.

एक बाजू जळून जाईल, दुसरी बर्फाळ होईल आणि समुद्र वाफ होऊ लागतील. उलट, जिथे सूर्यप्रकाश पोहोचणार नाही, तिथे तापमान इतकं खाली जाईल की संपूर्ण प्रदेश बर्फाच्छादित होईल. यामुळे सजीव सृष्टी टिकणं अशक्य होईल.

प्रसिद्ध वैज्ञानिक नील डिग्रास टायसन (Neil deGrasse Tyson) यांच्या मते, पृथ्वी जर अचानक फिरणं थांबवेल, तर आपण सर्व 800 मील प्रति तास (1,287 किमी/तास) या वेगाने पूर्व दिशेकडे फेकले जाऊ.

पृथ्वी फिरत असल्यामुळे समुद्र, हवा आणि वातावरण यांची एक विशिष्ट गती असते. जर पृथ्वी अचानक थांबली, तर या सगळ्या गोष्टी अचानक वेगात पुढे जातील.

सीनियर जिओलॉजिस्ट जेम्स जिंबलमॅन यांच्या मते, Conservation of Angular Momentum या भौतिकशास्त्राच्या सिद्धांतामुळे पृथ्वी पूर्णपणे थांबणे अशक्य आहे.

जर पृथ्वी थांबली तरी गुरुत्वाकर्षण आपल्या वातावरणाला आणि गोष्टींना धरून ठेवेल. पण तरीही त्याचे परिणाम विनाशकारी असतील.