फ्लाइटमध्ये AC बंद झाला तर… प्रवाशांसाठी किती धोकादायक?

विमानात एसी बंद होणं हा फक्त ‘थंडावा बंद’ होण्याचा मुद्दा नाही, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित गंभीर समस्या आहे.

विमान उंचावर उडताना हवेचा दाब कमी आणि ऑक्सिजनची पातळी खूप कमी होते, त्यामुळे एसी सिस्टम अत्यावश्यक असतो.

एसी सिस्टम केबिनमधील हवेचा दाब नियंत्रित करतो, ज्यामुळे प्रवाशांना श्वास घेणं सोपं होतं. एसी खराब झाल्यास केबिनमधील हवेची गुणवत्ता झपाट्याने घसरते, त्यामुळे श्वास घेणं अवघड होऊ शकतं.

दिल्ली–सिंगापूर फ्लाइटच्या घटनेत प्रवाशांना श्वास घ्यायला त्रास झाल्याने दोन तासानंतर ते विमानातून उतरवावे लागले.

विमानातील एसी हे मोठे आणि शक्तिशाली सिस्टम असतात; त्यांची क्षमता विमानाच्या साईज आणि मॉडेलवर ठरते.

विमानातील एसीचा मुख्य भाग म्हणजे AC Pack, जो इंजिन किंवा APU कडून येणारी गरम हवा थंड करून प्रवाशांना वापरण्यास योग्य बनवतो.

लोकांना वाटतं की एसी “थंडावा” देतो, पण खरं तर तो Cabin Pressure + Oxygen Flow नियंत्रित करणारी लाइफ-सपोर्ट प्रणाली आहे.

एसी बंद झाल्यावर काही मिनिटांत केबिनमध्ये श्वास थांबल्यासारखं वाटतं, त्रास, डोकेदुखी, चक्कर, आणि श्वसनाचा त्रास होऊ शकतो.

त्यामुळे विमानात एसी बंद होणं हा छोटासा तांत्रिक बिघाड नसून तत्काळ उपाययोजना करण्यासारखा धोकादायक प्रकार मानला जातो.