डासांना रक्त प्यायला मिळालं नाही तर काय होईल?

आपल्याला हे माहित आहे की डास माणसाचं रक्त पितात. त्यावरतीच ते जगतात.

पण कधी असा प्रश्न पडलाय का की जर डासांना रक्त मिळालं नाही तर ते कसे जिवंत रहातात?

मच्छर हे केवळ रक्तावर अवलंबून नसतात आणि त्यांच्याही आयुष्याचा एक वेगळा प्रवास असतो.

नर मच्छर कधीही रक्त शोषत नाहीत. ते फक्त फुलांचा रस किंवा इतर गोड पदार्थांवर जगतात. त्यामुळे त्यांचं आयुष्य फक्त 4 ते 7 दिवस असतं

माणसांचं रक्त पिणारा डास किंवा मच्छर ही मादी डास असते कारण तिला अंडी घालण्यासाठी प्रोटीनची गरज असते.

जर तिला रक्त मिळालं नाही, तरी ती काही आठवडे जिवंत राहू शकते. रक्त मिळाल्यानंतर ती 2 ते 4 आठवडे जगू शकते, तर योग्य वातावरणात काही मच्छर 1 ते 2 महिने जगतात.

जर मादी मच्छरला रक्त मिळालं नाही, तरी ती लगेच मरत नाही. ती फुलांचा रस, फळांतील गोड द्रव्यं आणि अन्य नैसर्गिक स्रोतांवर आपलं पोट भरू शकते.

मच्छराचं शरीर अतिशय हलकं असतं, त्यामुळे त्याला फार अन्नाची गरज लागत नाही. कमी उष्णता आणि दमट हवामान असलं, तर तो अधिक काळ टिकतो. पण खूप जास्त गरमी किंवा थंडी असेल, तर ते पटकन मरतात.

प्रत्येक मच्छर आपल्याला त्रास देतो असं नाही. पण काही मच्छर अत्यंत धोकादायक असतात. एडीज, अ‍ॅनाफिलीज आणि क्यूलेक्स हे मच्छर डेंगू, मलेरिया आणि चिकनगुनिया सारख्या जीवघेण्या रोगांचं वाहक असतात.