Black Warrant म्हणजे काय?

सिनेमात मुख्यता हा शब्द वापरला जातो. पण हा शब्द कशासाठी वापरला जातो हे फार कमी लोकांना माहित असेल?

Black Warrant हा एक अधिकृत कायदेशीर आदेश असतो, जो एखाद्या कैद्याच्या फाशीची तारीख आणि वेळ निश्चित करण्यासाठी न्यायालयाकडून जारी केला जातो.

याला डेथ वॉरंट किंवा फाशी वॉरंट असेही म्हणतात.

सर्व अपील फेटाळल्यानंतर जर एखाद्या आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली असेल आणि त्याने सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपतीकडे दया याचिका दाखल केली असेल, पण ती फेटाळली गेली, तर त्यानंतर ब्लॅक वॉरंट जारी केला जातो.

हा वॉरंट संबंधित तुरुंग प्रशासनाला पाठवला जातो, जेणेकरून आरोपीच्या फाशीची तयारी केली जाईल.

या आदेशात आरोपीला फाशी कधी आणि कुठे दिली जाणार आहे, याची स्पष्ट माहिती दिली जाते.

ब्लॅक वॉरंट जारी झाल्यानंतर कैद्याला त्याच्या शेवटच्या इच्छा पूर्ण करण्याची संधी दिली जाते.

याला “ब्लॅक” वॉरंट म्हणण्याचे कारण म्हणजे, हा आदेश मृत्युदंडाची अंमलबजावणी करण्यासंबंधी असतो. कायदेशीर दृष्टीने हा एक कठोर निर्णय असल्याने त्याला “ब्लॅक वॉरंट” असे नाव देण्यात आले आहे.

भारतात अजमल कसाब, याकूब मेनन, निर्भया प्रकरणातील गुन्हेगार यांना फाशी देण्यापूर्वी ब्लॅक वॉरंट जारी करण्यात आले होते.